26
सिंगुर व नंदिग्राम जमीन विवाद
डाव्या पक्षांची सिंगुर व नंदिग्राममधील जमीन संपादन धोरणे व या धोरणाविरुद्ध भूमी उच्छेद प्रतिरोध समीतीचा निषेध.
ह्या कागदपत्रात, राज्य सरकारने औद्योगिक विकासासाठी सिंगुर व नंदीग्राममधील ताब्यात घेतलेली (संपादन केलेली) शेतजमीन, डावे पक्ष व विरोधी पक्ष यामधील प्रादेशिक संघर्ष. ह्या धोरणामुळे झालेली निष्पाप लोकांची निर्घृण हत्या, स्त्रियांचा छळ आणि समाजाच्या निरनिराळ्या विभागांनी केलेला निषेध व टिका यासंबंधीची माहिती असावयास हवी.
27
भारत व चीनमधील संबंध
अर्थ, राजनीती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नागरी विमानसेवा ह्या संदर्भातील भारत व चीनमधील उभयपक्षी संबंध
युध्दाच्या आणि शांततेच्या अशा दोन्ही काळातून पार पडलेल्या भारत आणि चीन यांच्या परस्पर संबंधाची माहिती अक्साई चीन आणि अरूणाचल प्रदेश या दोन प्रदेशाच्या सरहद्दीसंबंधी विवाद त्यांचे आर्थिक, व्यापारी आणि तंत्रज्ञान विषयक परस्पर सहकार्य, राजनैतिक देवाण घेवाण आणि परस्पर क्रिया या संदर्भातील माहिती सुसंगत आहे.
28
इराणचा आण्विक कार्यक्रम
इराणचा आण्विक कार्यक्रम आणि त्यांच्या आण्विक धोरणाबाबत जगाचा दृष्टीकोन.
इराणचे अण्वस्त्रविषयक (अणुविषयक) धोरण आणि अशा अण्वस्त्रविषयक कार्यक्रमाविरूध्द, अमेरिकेचा इराणवरील सततचा राजनैतिक दबाव व धमक्या ह्या विषयीची माहिती संबंधित कागदपत्रात असावयास हवी. अणुविषयक धोरण आणि जगाचा दृष्टिकोन यातील समन्वया संबंधी इराण आणि युरोपियन युनियन यांच्यातील वाटाघाटी महत्वाच्या आहेत.
29
सुनामी आणि त्याचे परिणाम.
२६ डिसेंबर, २००४ रोजी सुनामीमुळे घडलेला विध्वंस आणि परिणामी बाधित झालेली लाखो आयुष्ये.
सुनामीने केलेला धक्कादायक आणि अभूतपूर्व विनाश, त्याने ग्रस्त झालेले जनजीवन (आपादग्रस्त लोकांची संख्या) निरनिराळ्या संस्थांनी मानवतावादी भूमिकेतून केलेली मदत, पायाभूत सोयी कोलमडून पडल्यामूळे परिणामी अन्न व स्वास्थ्य सेवेच्या पुरवठ्यातील चणचण/तुटवडा, लोकांची सध्या असलेली सामाजिक-आर्थिक परिस्थिती, ह्याविषयीची माहिती संबंधित कागदपत्रात असावयास हवी.
30
भारतीय रेल्वे मंत्री म्हणून लालू प्रसाद यादव.
भारतीय रेल्वे मंत्री म्हणून लालू प्रसाद यादवांची भूमिका.
एक रेल्वेमंत्री म्हणून लालूंची भूमिका, पायाभूत सोयींच्या बाबतीत रेल्वेच्या दर्जामध्ये सुधारणा, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तयार केलेल्या रेल्वे अंदाजपत्रकातील सर्व लहान मोठ्या बाबी, गोध्रा येथील रेल्वेगाडी घटनेचा उलगडा करण्या-मध्ये उच्चाधिकार चौकशी आयोग बोलाविण्यामधील लालूंची भूमिका या संबंधीची माहिती संबंधित कागदपत्रात असली पाहिजे. या व्यतिरिक्त इतर माहिती येथे सुसंगत नाही.
31
भारतीय उपखंडातील दहशतवादी हल्ले.
भारताच्या वेगवेगळ्या भागातील दहशतवादी हल्ले.
भारतातील आतंकवादाच्या घटना, ह्या हल्ल्यांमागे असलेल्या अनेक आतंकवादी गटांच्या सहभागाबाबत पोलिसांनी विविध पध्दतीने केलेले मुल्यमापन आणि बळी पडलेल्यांची संख्या आणि शासनाने दिलेली मदत या विषयीच्या माहितीचा संबंधित कागदपत्रात समावेश असला पाहिजे.
32
काँग्रेस व तिचे तिच्या मित्रपक्षांबरोबरचे संबंध.
सध्याच्या युपीए शासनातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष व तिचे मित्रपक्ष ह्यांतील संबंध.
किमान समान कार्यक्रमावर आधारित यूपीए सरकारची स्थापना, काँग्रेस पक्ष आणि सीपीआय (एम), सीपीआय, तेलगु देशम, जनतादल इत्यादिंसारख्या त्याला पाठिंबा देणारे पक्ष यांच्यामधील परस्परसंबंध, अमेरिका-भारत अणु करार, आर्थिक सुधारणा इत्यादींसारख्या प्रश्नावरील शासनामधील अंतर्गत वाद या संबंधीची माहिती कागदपत्रात असली पाहिजे.
33
अध्यक्ष बुश ह्यांची भारतभेट.
अध्यक्ष बुश ह्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या दोन कालखंडाच्या कारकीर्दीत भारतास दिलेली पहिली भेट.
बुश यांची भारताला भेट, संभाव्य अणु करार, त्यांचा हैद्राबाद आणि काही ग्रामीण भागातील दौरा, हे मुद्दे येथे सुसंगत आहेत.
34
जेसिका लाल खून खटला
जेसिका लालचा खून आणि त्याची सुनावणी.
जेसिका लाल ह्या मॉडेलचा खून, त्यानंतर सात वर्षांपर्यंत चाललेला तो खटला आणि शेवटी मनु शर्माला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा हे कागदपत्रात समाविष्ट केले गेले पाहिजे. या व्यक्तिरिक्त इतर असंबध्द माहिती येथे आवश्यक नाही.
35
भारताच्या वेगवेगळ्या भागातील नक्क्षलवादी हल्ले.
भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील नक्षलवादी हल्ले आणि अशा हल्ल्यांचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासन व विविध राज्ये ह्यांनी योजलेले उपाय.
संबंधित कागदपत्रात, पोलिस व नागरीकांना नक्षलवाद्यांनी केलेला हिंसाचार पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या राज्यांमधील नोकरशहा यांच्यामधील सभा आणि नक्षलवाद्यांच्या दहशतवादी उपद्रव थोपवण्यासाठी उचललेली पावले यासंबंधीचे अहवाल संबंधित कागदपत्रात असले पाहिजेत.
36
नर्मदा धरण बांधकामाविरुद्ध निषेध.
नर्मदा बचाव आंदोलनाने वादग्रस्त धरण बांधकामाविरुद्ध आयोजित केलेला निषेध.
वादग्रस्त नर्मदा धरणाचे बांधकाम तसेच पर्यावरणवादी आणि सिने अभिनेते यांचा समावेश असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून केला गेलेला निषेध यांची माहिती संबंधित कागद पत्रात असायला पाहिजे. हजारो कुटुंबांचे धरणामुळे होणारे अपरीहार्य स्थलांतर आणि त्यामुळे या प्रदेशाची होणारी हानी यासंबंधीची माहिती देखील महत्वाची आहे.
37
नेपाळमधील बदलती राजकीय परिस्थिती.
हिमालयीन राज्य नेपाळमधील जलद बदलणारी राजकीय परिस्थिती.
संबंधित कागदपत्रात, राजकीय अस्थिरता आणि राजे ग्यानेंद्र यांच्या शाही बंडा मधून त्यांचे कार्यकारी अधिकार बळकावल्यानंतर झालेल्या चळवळीसंबंधीची माहिती
असावयास हवी. माओवादी बंडखोरां कडून सतत होणारा हिंसाचार बहु-पक्ष प्रणालीबाबत त्यांचा करार आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्या गेल्याने शेवटी सरकार सोडून बाहेर पडणे हे देखील महत्वाचे आहे.
38
ग्रेग चॅपल व सौरव गांगुलीमधील अशांत समेट.
भारतीय प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि कर्णधार सौरव गांगुली ह्यांच्यातील अशांत समेट.
चॅपेल व गांगुली यांनी परस्परांवर केलेले आरोप-प्रत्यारोप, चॅपेल यांनी बीसीसीआय ला पाठविलेला ई-मेल चा वृतपत्र माध्यमांद्वारे गौप्यस्फोट, बीसीसीआयने हा वाद निकालात काढण्यासाठी नेमलेली पुनर्विचार समिती यासंबंधीची माहिती संबंधीत कागदपत्रात समाविष्ट केली जावी.
39
बगदादमधील बाँबस्फोट
बगदादमध्ये घडणारे बाँबस्फोट
संबंधित कागदपत्रामध्ये शहरातील स्फोटांच्या मालिका, आत्मघातकी मानवी बाँब चे हल्ले स्फोटांमागील कारणे आणि बगदादमधील मृतांची संख्या, यासंबंधीची माहिती असली पाहिजे.
40
पाकिस्तानच्या न्यायदान यंत्रणेतील भ्रष्टाचार.
न्यायदान यंत्रणेतील भ्रष्टाचार व पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश श्री. इफ्तिखार महम्मद चौधरींचे निलंबन ह्यांवरील वृत्त देणारे लेख शोधा.
संबंधित कागदपत्रांत न्यायालयीन स्तरावरील भ्रष्टाचार आणि राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी, 'दुर्वर्तन' व 'अधिकारा' चा गैरवापर या आरोपासाठी सरन्यायाधीशाचे केलेले निलंबन विविध स्तरांवरील पाकिस्तानी जनतेमधील असंतोष आणि अशा निर्णया विरूध्द सार्वत्रिक तीव्र निषेध, दंगानियंत्रक पोलीसांकडून निषेध कर्त्यांना स्थानबध्दता व अटक शेकडो वकीलांचा संप, आंतर्राष्ट्रीय स्तरावर राष्ट्राध्यक्षांवर दोषारोप आणि अखेर मुशर्रफ यांनी माघार घेतल्यावर चौधरी यांची पुनर्नेमणूक, ह्या महत्वाच्या घडामोडींचा वृतांत समाविष्ट असावा.
41
फ्रान्स मधील नवीन कामगार कायदे
फ्रान्स मधील नवीन कामगार कायद्यांची ओळख आणि त्याला विरोध यासंबीधीची कागदपत्रे शोधा.
या कागदपत्रात-फ्रासमध्ये प्रथमच संसदेने स्वीकारलेला व लागू केलेला नोकरी करार कायदा फ्रांस मधील कामगार संघटना, विद्यार्थी व युवकांनी नवीन नोकरी करार कायद्याच्या विरूद्ध प्रतिक्रिया म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेले निषेध आंदोलन फ्रेंच दंगलनियंत्रक पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला CPE रद्द करण्याबाबत फ्रेंच अध्यक्षांची घोषणा कामगार संघटना नेत्यांचा शासनला कायदा मागे घेण्याबद्दल अन्यथा नजिकच्या काळात घडलेल्या सार्वत्रिक संपाला पुनश्च सामोरे जाण्यासंबंधी इशारा ही सर्व माहिती समाविष्ट असावी.
42
उत्तर कोरीयाची आण्विक नीती : जागतिक दृष्टिकोन
उत्तर कोरीया व त्याची प्रचंड प्रमाणावर संहार करणारी शस्त्रे.
संबंधित कागदपत्रात उत्तर कोरियाची अणुचाचणी आणि अण्वस्त्र जवळ असल्याचा उत्तर कोरियाचा दावा, अमेरिकेच्या सहा सदस्यांचा सहभाग असलेली सभा आयोजित करण्याबदल आवाहन, त्यावर उत्तर कोरियाचा नकार, केवळ अमेरिकेशी दुहेरी चर्चा करण्यास संमती, आणि या प्रश्नाच्या बाबतीत जगातील नेत्यांची मते या सर्वांचा समावेश असावा.
43
शैक्षणिक संस्थांमध्ये विशिष्ट पोशाख-निर्बंधाची सक्ती करणे.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी केलेली पोशाख-निर्बंधाची सक्ती.
संबंधित कागदपत्रामध्ये विद्यापीठ, महाविद्यालये आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेषत: विद्यार्थिनीं साठी आणि शिक्षक प्राध्यापकांसाठी विशिष्ट प्रकारच्या पोशाखाची सक्ती लागू करणे, ह्या प्रश्नावरून झालेला तीव्र मतभेद व विवाद आणि त्याचा परिणाम म्हणून अधिकारी व्यक्तीने घेतलेले निर्णय याची माहिती असली पाहिजे.
44
ब्रिटनमधील दहशतवादी हल्ले.
दहशतवाद्यांचा लंडनवर बाँबस्फोट मालिकेतून आघात.
संबंधित कागदपत्रांमध्ये इ.स. 2005 मध्ये लंडनमध्ये दहशतवाद्यांनी चार वेगवेगळ्या आत्मघातकी बॉम्बधारक दहशतवाद्यांच्या मदतीने घडवलेले आतंकवादी हल्ले, तसेच ग्लासगो विमान तळावरील नजिकच्या काळात झालेला हल्ला, या वेळी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, या शिवाय पोलिसांनी घातलेले छापे आणि संशयितांना केलेली अटक हे ही महत्वाचे मुद्दे आहेत. या सर्वांचा समावेश असायला हवा.
45
जागतिक तापमान वाढ
जागतिक तापमानवाढीची चिन्हे आणि त्या समस्येवरील उपाय
संबंधित कागदपत्रांमध्ये पृथ्वीच्या वाढत्या तापमानाची कारणे आणि आपल्या ग्रहावर (पृथ्वीवर) त्याचे परिणाम तसेच त्यामुळे मानवजातीला सोसावे लागणारे गंभीर परिणाम आणि त्या त्या भागातील सरकारी तसेच गैर सरकारी संघटना/संस्था यांनी हे वाढते तापमान कमी करण्यासाठी अथवा भविष्यातील वाढत्या तापमानास उलट दिशेने (कमी तापमाना कडे) वळवण्यासाठी केलेले उपाय यांच्या विषयी वृत्तांत समाविष्ट केलेले असावेत.
46
५० तासांच्या खडतर अनुभवानंतर प्रिन्सची सुटका.
५० तासांच्या खडतर अनुभवानंतर अंधाऱ्या विवरातून बाहेर आलेल्या प्रिन्सचे स्वगृही आगमन.
कागदपत्रात अंधाऱ्या व ओलसर ३ फूट खोल विवरात ५० तास घालवल्या नंतर प्रिंस कुमारच्या झालेल्या सुटके विषयी माहिती असावी या व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे येथे सुसंगत नाहीत.
47
नाहीसे झालेले नोबेल पारितोषक
एक बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर ह्यांचे नोबेल पारितोषक चोरीस गेले.
संबंधित कागदपत्रात प्रसिद्ध कवी आणि लेखक रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यासाठी मिळालेले आशियाचे सर्व प्रथम नोबेल पारितोषिक, इतर काही दुर्मिळ कलाकृती, टागोरांची चित्रे यांच्या सह नीहीसे झाले आणि सी.बी.आय. चा नाहीसे झालेल्या नोबेल पारितोषका साठी चाललेला तपास अचानक स्थगित झाल्या विषयीची माहिती समाविष्ट असावी. इतर नोबेल पारितोषिकांच्या गहाळ होण्याबदल ची माहिती येथे सुसंगत नाही.
48
निठारी खून खटला.
२००६चा नॉयडा खून खटला आणि त्याचा तपास.
नोईडा योथील निठारी या खेड्यातील हत्यांची मालिका अनेक लहान मुले आणि एक २० वर्षांची मुलगी त्यात बळी पडली आणि त्यांना पाशवी रीतीने मारले गेले या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक आणि पोलीस व सी.बी.आय. यांनी केलेल्या गुन्ह्याचा तपास ह्या सर्व माहितीचा संबंधित कागदपत्रात समावेश असावा.
49
जगभरच्या नैसर्गिक आपत्ती
जगाच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती.
संबंधित कागदपत्रात - दरड कोसळणे, ज्वालामुखीचे उद्रेक, सुनामी, तीव्र वादळ, कटरीना, भूकंप, पूर, चक्री वादळ इत्यादि सारख्या जगाच्या विभिन्न भागात घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्याबरोबरच विविध जागतिक संघटना आणि त्या त्या देशातील शासन ह्यांच्या कडून आपादग्रस्त देशांना मिळणारी अनेक प्रकारची मदत याबद्दलच्या माहितीचा समावेश असावा
50
कोलकता पुस्तक प्रदर्शन
कोलकता पुस्तक प्रदर्शन आणि मेळाव्याच्या कार्यस्थळासंबंधीचा वाद
संबंधित कागदपत्रांमध्ये पुस्तक मेळ्याचा मध्यवर्ती/प्रमुख विषय, नव्या पुस्तकांचे विमोचन (प्रकाशन), ग्रंथप्रेमी लोकांच्या प्रतिक्रिया,मेळ्याच्या कार्यस्थळा विषयी अनिश्चितता, कार्यस्थळ बदलल्यानंतरचा परिणाम, पर्यावरणवादी लोकांनी घेतलेल्या हरकती आणि त्यासाठी सादर केलेली कारणे ह्या बाबींचा वृत्तांत असावयास हवा.
51
शैक्षणिक व्यवस्थेतील भ्रष्टाचार.
शैक्षणिक व्यवस्थेतील प्रचालित भ्रष्टाचाराचा व त्याचा प्रतिबंध.
संबंधित कागदपत्रात विद्यार्थ्यांकडून प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक विभागांकडून घेतली जाणीरी लाच, तसेच शहरी व ग्रामिण भागातील शिक्षकांच्या नेमणुका व बदल्यांसाठी घेतली जाणारी लाच यांचे वृत्तांत असायला हवेत.
52
२००६-२००७ अंदाजपत्रक
२००६-२००७ च्या अंदाजपत्रकात केलेले अंदाज आणि त्यांचे प्रभाव.
पुन:प्राप्त कागदपत्रांमध्ये-मंत्रालय विभागांकडून घोषित केलेले प्रस्ताव आणि खर्चाची अंदाज पत्रके, प्रस्तावित अर्थसंकल्पाचा आर्थिक प्रभाव, दारिद्रय रेषेखालील जनतेसाठी तयार केलेल्या योजना आणि भारतीय जनतेने अर्थसंकल्पावर केलेली टीका या बाबीसंबंधीची माहिती पुरवलीच पाहिजे.
53
भारत-अमेरिका आण्विक करार
भारत व अमेरिका ह्या दोन लोकसत्ताक देशांमधील आण्विक करार
संबंधित कागदपत्रांत अमेरिकेच्या अणुविषयक धोरणसंबंधी दोन देशातील संमत करार, करारातील अटी, या करारा मागील कायद्याच्या पळवाटा, दोन्ही देशाच्या काही राजकीय पक्षांनी कराराविरूद्ध केलेला निषेध आणि अणुकराराशी संबंधित निर्माण होणारे अनेक प्रश्न याविषयीच्या माहितीचा समावेश असावा.
54
एचआयव्ही आणि एड्स साथ
एचआयव्ही / एड्स ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी आरोग्यविषयक चिंतेची बाब आहे.
संबंधित कागदपत्रात-एच.आय.व्ही (पॉझिटिव्ह) रूग्णांची लक्षणे रोगाची कारणे आणि उपचार एच.आय.व्ही./एड्स ची लागण होण्याच्या प्रमाणात संथपणे सतत वाढ, ह्या रोगावरील औषधे, रोगाची साथ थोपवण्याचे उपाय आणि एच.आय.व्ही. बाधित रूग्णांसाठी सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया-याविषयी माहिती पुरवली जावी.
55
सानिया मिर्झाची टेनीस कारकीर्द
भारतीय टेनीसचा झंझावात सानिया मिर्झाची विलक्षण कामगिरी
आत्तापर्यंतच्या सानियाच्या टेनिसच्या कारकिर्दित तिला मिळालेली पारितोषिके,तिचे यश, एकरी व दुहेरी सामन्यांमधील तिचे स्थान, डब्लू.टी.ए. (वर्ल्ड टेनिस असोसिएशन) मधील तिचा अद्ययावत गुणक्रमांक तिच्या पुढील काळात होणारे सामने ह्या बाबीसंबंधी माहिती देणारी कोणतीही कागदपत्रे सुसंगत आहेत.
56
मोबाईल फोन वापरणाऱ्यां मधील वाढ
मोबाईल फोनच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे व ते २१व्या शतकातील अंमली पदार्थाविना असलेले-व्यसन बनत आहे.
संबंधित कागदपत्रांत मोबाइल फोनच्या वापरात होणाऱ्या गतिमान वाढीमुळे होणारे हानिकारक परिणाम, मोबाइल फोनच्या उत्सर्जन होणाऱ्या लहरींमुळे निर्माण होणारी लक्षणे, वैज्ञानिक व डॉक्टरांची त्यासंबंधीची मते, कॅमेरा मोबाइलच्या वापरामुळे समाजात निर्माण होणाऱ्या समस्या या बाबीसंबंधी वृत्तांत असावेत
57
सलमान खानवरील दुर्मिळ काळवीटाच्या हत्येचा खटला.
नामशेष होण्याचा धोका असलेल्या चिंकारांच्या हत्येसाठी झालेली सलमान खानची अटक.
संबंधित कागदपत्रांमध्ये ब्लॅक बक प्रजातीच्या काळविटांची हत्या केल्याबद्दल सलमान खानला झालेली अटक, पाच वर्ष कालावधीची कारावासाची सादर केलेले अपील (पुनर्विचारासाठी विनंती अर्ज)
58
थायलंड मधील अवैध राजकीय सत्ता परिवर्तन.
अवैध राजकीय सत्तापरिवर्तनाच्या नेत्यांच्या कारवाया व त्यांचे परिणाम.
संबंधित कागदपत्रात थायलंडच्या राज्यघटनेची विधीमंडळाची आणि मंत्रीमंडळाची सत्तापरिवर्तनच्या नेत्याकडून झालेली बरखास्ती तसेच या लष्करी उठावातून सत्तापरिवर्तनाच्या काळात झालेली मानवी हक्कांची पायमल्ली ह्यांविषयी माहिती असावी.
59
इराक युद्धाविरुद्ध अमेरिकी नागरिकांचा निषेध व निदर्शने.
इराकयुद्धामुळे अमेरिकी नागरिक जॉर्ज डब्ल्यू बुशविरूद्ध निदर्शने करत आहेत.
संबंधीत कागदपत्रात-अमेरिकन जनता आणि राजकीय पक्षांचा निषेध, युद्धाच्या निषेधार्थ आयोजित प्रचंड संघटित निदर्शने आणि अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सभा, बुश विरोधी घोषवाक्य असलेले टी-शर्टस् घातल्याबद्दल अमेरिकन नागरीकांना अटक तसेच जनसामान्यांकडून मोठ्या प्रमाणावर, इराक युद्ध तीव्र करण्याबद्दल दबाव
60
अल-कायद्याच्या दहशतवादी कारवाया.
अल-कायद्याच्या दहशतवादी कारवायांचे वृत्त देणारे लेख शोधा.
संबंधित लेखात- अल्-कायद्याच्या दहशतवादी कृत्यांबद्दलची माहिती, त्यांच्या हल्ल्यामुळे प्रभावित राष्ट्रे, दहशतवादामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, त्या त्या शासनांनी अल्-कायद्याच्या कारवाया नियंत्रित करण्यासाठी केलेले उपाय यांच्या विषयीच्या माहितीचा समावेश असायला हवा.
61
हॅरि पॉटरच्या लोकप्रियतेची सार्वत्रिक लाट.
हॅरि पॉटरच्या प्रकाशनाबाबत जगभर पसरलेले सार्वत्रिक वेड.
आम्ही पॉटर मेनियावर काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे संपूर्ण जग व्यापलय, मध्यरात्री प्रदर्शित झालेल्या हॅरी पॉटरच्या पुस्तकांचे मसालेदार प्रकाशन, पॉटरच्या चाहत्यांची मत, मूळ पुस्तकाच्या सिनेमातील रुपांतरणाबद्दलची लोकांमधील खळबळ
62
केंद्र सरकारचा भ्रष्टाचार
विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले केंद्र सरकारचे अधिकारी.
विविध प्रकारचा भ्रष्टाचार सरकारी स्तरावर रूढ आहे. सी. बी. आय. ने तपासासंबंधी उचललेली पाऊले ऑन्टी करप्शन ब्यूरो द्वारा केलेला भ्रष्टाचारासंबंधी तपास व प्रतिबंध सरकारी उच्चाधिकाऱ्यांनां केलेली अटक व भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेला लेखी विरोध
63
नेताजींच्या मृत्यूच्या रहस्याचा उलगडा.
नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या मृत्यूबाबतची अनिश्चितता व विविध परस्पर विरोधी विसंगतीपूर्ण मते.
नेताजींच्या गहन मृत्यू संबंधी माहिती, सरकारचा नेताजींचा विमान कोसळल्यामुळे झालेल्या मृत्यूचा प्रचार, सरकारने नेताजींच्या मृत्यू संबंधीचे खाजगी कागद व दस्ताऐवज प्रकट करण्यास नकार दिला आणि भारतीय लोकांनी नेताजींच्या गहन मृत्यूबाबतचं सत्य दस्ताऐवजात असली पाहिजे. अशी मागणी केली.
64
सभरवाल खून खटला.
उज्जैनचे प्राध्यापक एच.एस. सभरवाल ह्यांचा अ.भा.वि.प.च्या विद्यार्थ्यांकडून झालेला खून.
उज्जैन मधील प्राध्यापक सभरवाल यांच्या निदर्यपणे करण्यात आलेल्या खूनाच्या माहिती संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांविरूद्ध प्रत्यक्षसाक्षी यांची प्रतिक्रिया आरोपित व्यक्तीची न्यायालयीन चौकशी आणि तात्पुरती स्थगितीचे पोलिस हे सुद्धा दस्ताऐवजात असले पाहिजे. इतर खूनी घटना समर्पकपणे नको
65
दाऊद ईब्राहिमच्या शोधात सी.बी.आय.
सर्वाधिक पाहिजे असलेला गुन्हेगार दाऊद ईब्राहिमसाठी सीबीआयचा सतत शोध.
कोणत्याही समर्पक दस्ताऐवजात जागातिक आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या कुप्रसिद्ध हालचाली संबंधित माहितीची तरतूद असलीच पाहिजे सी. बी. आय. ने आंतरराष्ट्रीय पोलिस दलास दाऊदला पकडण्यास मदत करण्याची विनंती केली. दाऊदचे राष्ट्रीयत्व संबंधित संशायित आणि ज्या देशांनी कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला आश्रय दिला यांच्यावर जोर देण्यासाठी सी. बी. आय. ने आंतरराष्ट्रीय समिती तयार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
66
खादिम मालकाच्या अपहरणाचा खटला.
खादिम मालक पार्थो प्रतिम रॉय बर्मन ह्यांच्या अपहरणाचा खटला.
कोणत्याही दस्ताऐवजात खादिमच्या स्वःच्या अपहरणासंबंधित माहितीची तरतूद असली पाहिजे, अवाढव्य रूपयांची मागणी गुन्हेगारांना अटक करून फाशीची शिक्षा, एफ. बी. आय. ची अपहरण खटल्यात गुंतागुंत
67
बोफोर्स भानगडीचे पुनरुज्जीवन.
बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरण आणि काँग्रेसपक्षासह क्वात्रोचीचा सहभाग.
मनमोहन सिंग यांच्या कारर्किदी पर्यंत भारतीय राजकरणाचा सभोवतालच्या देखाव्यात बोफोर्स स्कॅम चा आघात या संबंधीची माहिती दस्तऐवजात असावी. क्वात्रोची यांच्या बँक खात्याबद्दल विरोधी पक्षाची भूमिका, भारत सरकारने क्वाटोरची बद्दल दिलेल हस्तांतरण अर्जेटिना न्यायालयाने नाकारले, आंतरराष्ट्रीय पोलिस दलाची ओट्टाव्हिओ क्वात्रोची विरूद्ध रेडकॉर्नर सूचना
68
अमरनाथ यात्रा
अमरनाथची पवित्र तीर्थयात्रा आणि या प्रवासानंतर घडलेल्या घटना
अमरनाथच्या धार्मिक तीर्थाची संबंधित माहिती, यात्रेकरूंचा प्रवास निरपराधी यात्रेकरूंवर आतंकवाद्यांचा हमला, दस्तऐवजात वाद्यांशी संबंधित नैसर्गिक रचना तीर्थ, सगळ्यांचा समावेश असावा याव्यतिरिक्त माहिती समर्पकपणे इथे देऊ नये.
69
भारतीय रेल्वे अपघात
भारतीय रेल्वे मध्ये घडलेले अपघात
घडलेल्या अपघातांमुळे भारताचे वेगळेपण दाखविणार्या संबंधिची माहिती दस्ताऐवजात असावी अपघातानंतरचा परिणाम मरण पावलेले किंवा जखमी झालेल्या लोकांची संख्या आणि सरकारकडून मिळालेली मदत, इतर अपघात इथे प्रासंगिक आहेत.
70
बॉलीवूडमधील पुनर्निर्माण.
बॉलीवूडमधील हिंदी अभिजातपटांच्या पुनर्निर्माणाची एक मालिका येऊ घातली आहे.
पुनःनिर्मित चित्रपट जे एकदाच लाभदायक ठरले आणि पडले त्यांच्या नावांशी संबंधित माहिती दस्ताऐवजात असावीत चित्रपटांशी संबंधित टिका करणारा प्रेक्षक आणि स्पष्टीकरण करणारे दिग्दर्शक आणि पुनःनिर्मिती चित्रपटा संबंधित अभिनेता आणि आभिनेत्री या व्यतिरिक्त माहिती इथे देऊ नये.
71
भारतीय मुस्लिम यात्रेकरूं
भारतीय मुस्लिम यात्रेकरूंची मक्का भेट
मक्का येथे भेट देणाऱ्या भारतीय मुस्लिम यात्रेकरुंची समर्पक माहिती दस्तऐवजात असावी हुकुमाचा नियम असलेल्या सौदी अरेबियन शासनाने पोलिओ रोगापासून निर्भय झालेल्या हज यात्रेकरूंचा अधिकृत परवाना निर्दोष ठरवून हजयात्रेसाठी दिला आणि शासनाने हजयात्रेकरुंसाठी द्रव्यसाहाय्य देण्याचे नाकारले.
72
मुद्रांक घोटाळा/भ्रष्टाचार
सरकारी मुद्रांकाची बनावट करण्याबाबत आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्ती.
अटक झालेले व तातपुरती स्थागिती असलेले वस्तुस्थिती मांडलेल्या व्याक्ती बरोबरच उच्च विशेष दर्जा असलेले शासनास योग्य तर्हेने अधिकृतपणे संबंध असलेले एक करोडपेक्षा अधिक खोटी कागदपत्रांची माहिती या दस्ताऐवजात असावी इथे अप्रासंगिकपणे इतर माहिती जवळ नसावी
73
झिदादिन झिदानेची विश्वचषक स्पर्धेत माथ्याने धडक देण्याची घटना.
मातेराझीने झिदादिनबाबत एक अपमानकारक व डिवचणारा शेरा मारल्यानंतर झिदादिन झिदानेने विश्वचषक २००६च्या अंतिम फेरीत त्याने मातेराझीला माथ्याने धडक दिली.
जागतिक चषक सामन्याच्या अंतिम फेरीत झिदानेला मॅटराझीकडून झालेल्या डोक्याच्या माराच्या घटनेनंतर इटालियन खेळाडू मॅक्रो मॅटराझीची अपमानास्पद झालेल्या टिका समर्पकपणे दस्तऐवजात असाव्यात झिदानेचे समर्थन आणि मॅटराझीला शिक्षा करण्याची त्याची मागणी आणि त्याने जिंकलेले बक्षिस सोन्याचा चेंडू या बद्दलची माहिती द्यावी.
74
भारत-पाक नियंत्रणरेषेची समस्या
भारत-पाक संबंध व दोन्ही देशांमध्ये रेंगाळलेली नियंत्रणरेषेबाबतची समस्या
पाकिस्तानच्या एल. ओ. सी. पासून भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मिरमध्ये आतंकवाद्यांमार्फत सैनिकांचे देशात न कळतपणे शिरणे, दोन्ही राष्ट्रांमध्ये झालेली बोलणी व एल. ओ. सी. च्या वादावर झालेला ठराव यांचा या दस्तऐवजात समर्पकपणे अंतर्भाव असला पाहिजे त्या व्यतिरिक्त माहिती इथे असू नये.
75
ब्रिटनचे नवीन पंतप्रधान
गॉर्डन ब्राऊनयांनी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेण्याबाबत वृत्त देणारा लेख शोधा.
गॉरडॉन ब्राऊन यांच्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या अधिकारग्रहणा बाबतच्या अटींचे दस्ताऐवजात समर्पकता असावी गॉरडॉन ब्राउन यांच्या पंतप्रधानपदाच्या मतदानसंदर्भात कामगार पक्षाचा निर्णय आणि कामगार पक्षाला ब्राउनमार्फत मिळणाऱ्या फायद्यांसाठी त्यांच्या करारांचे आणि वचनांची पुनःपडताळणी करणे.